परवानाधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर आवश्यक

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव शहरातील सर्व परवाना धारक ऑटो रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी लोकशाही दिनी जळगाव जिल्हाधिका-यांना या प्रकरणी निवेदन दिले होते. जळगाव शहरातील रिक्षा चालक मिटर न  बसवता अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

जिल्हा प्रशासनाने  या तक्रारीची दखल घेत जळगाव शहरतील ज्या ऑटो रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर नसेल त्या रिक्षा चालकांनी 8 नोव्हेंबर पर्यंत मिटर बसवून घेण्याचे तसेच अद्यावत करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसे न झाल्यास ऑटो रिक्षा परवानाधारकावर वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here