स.पो.नि. संदीप परदेशी नियंत्रण कक्षात – उलटसुलट चर्चेला उधान

जळगाव (क्राईम दुनीया न्युज नेटवर्क) : रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांची अचानक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. स.पो.नि. संदीप परदेशी यांच्या अचानक कंट्रोल बदलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स.पो.नि. परदेशी यांची कामगिरी चांगली असतांना त्यांची नियंत्रण कक्षात झालेल्या बदलीमागे नेमके काय कारण असावे? असा एक भोळाभाबडा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. खंडेराव नगर परिसरातील कैलास हटकर याच्या जुगार अड्ड्यावरील छापा हे एक कारण असल्याचे बदलीच्या निमीत्ताने बोलले जात आहे.

स.पो.नि. संदीप परदेशी यांच्या कामाचा इतिहास बघता तो चांगला असल्याचे म्हणावे लागेल. स.पो.नि. संदिप परदेशी यांनी सन 2020 मधे रावेर दंगलीच्या वेळी 3100 लिटर अवैध पेट्रोल, डीझेल व रॉकेलवर कारवाई केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला कार्यरत असतांना सुमारे दोन लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा त्यांनी जप्त केला. या कारवाईमुळे त्यावेळी चार पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा झाले होते. बंटी पथरोड गॅंग व इतर हद्दपार आरोपींवर त्यांनी बेधडक कारवाई त्यावेळी केली होती. भुसावळ बाजारपेठला असतांनाच अवैध पिस्टल (कट्टा) बाळगणा-यांवर कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ माजली होती.

त्यानंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनला आल्यावर देखील त्यांच्या कारवायांचा धडाका सुरुच राहीला. जुगार, दारु, बलात्कार व प्राणाघातक हल्ला यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास त्यांनी योग्य रितीने लावला. या गुन्ह्यातील आरोपींची जेल रवानगी करण्यात त्यांच्या तपासाचा वाटा असल्याचे म्हटले जाते. जळगाव नगरीचे शिवसेनेचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. या गोळीबार प्रकरणाचा योग्य रितीने त्यांनी तपास केला. कुणाच्याही दडपणाला बळी न पडता रेतीच्या अवैध वाहतुकीसह सट्टा – जुगार अड्डे चालवणा-यांवर त्यांची कारवाई सुरुच होती.

रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील खंडेराव नगर परिसरात कैलास हटकर याच्या जुगार अड्ड्यावर 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी कारवाई केली. या कारवाईची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या कारवाईमुळे काही जण दुखावले गेले. या कारवाई दरम्यान त्यांना त्यांच्याच सहका-यांकडून असहकार्य झाल्याचे कुठे दबक्या तर कुठे खुल्या आवाजात म्हटले जात आहे. या कारवाईमुळेच त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्याचे देखील बोलले जात आहे. कैलास हटकर याच्या जुगार अड्डयावरील कारवाईचे पडसाद स.पो.नि. परदेशी यांच्या बदलीमागे लपले असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्या तक्रारीवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे देखील म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here