तमाशा फड मालकांना लागले यात्रेचे वेध

सध्या कोरोनाचे निर्बंध मोठ्या प्रमाणात सैल झाले आहेत. कोरोना नियंत्रणात आला आहे. सर्व व्यवहार पुर्व पदावर आले आहेत. आता लवकरच यात्रांचा हंगाम सुरु होणार असल्यामुळे तमाशा फड मालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोना महामारीमुळे तमाशा फड मालकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेक तमाशा फड मालक व कलावंत पर्यायी उत्पनासाठी शेतात कामाला जात होते. मात्र आपल्या हक्काच्या कलेवर उदरनिर्वाह करण्यासाठी सर्वच तमाशा मालक व कलावंत आता सरसावले आहेत.

खानदेशातील धुळे येथील जेलरोडवर तमाशा मालक व कलावंत सुपारी घेण्यासाठी हजेरी लावत असतात. तमाशा कार्यक्रमाचे आयोजक धुळे शहरातील जेलरोडवर जमलेल्या तमाशा फड मालकांसोबत बोलणी करण्यासाठी जात असतात. कोरोनाचे निर्बंध सैल झाल्यामुळे व यात्रेचा हंगाम सुरु होण्याच्या बेतात असल्यामुळे धुळे येथील जेलरोड परिसरात तमाशा कलावंताची हजेरी मंगळवारी दिसून आली.

दिवाळी सणानंतर यात्रेचा हंगाम सुरु होत असतो. धुळे येथे जमलेल्या फड मालकांना तमाशा कार्यक्रमाची ऑर्डर (सुपारी) मिळू लागल्याने त्यांच्या आर्थिक चक्राला गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक सर्व कलावंताचे मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. तमाशाच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाची जाहीरात देखील केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here