गायरान बचाव मंच तर्फे मुकमोर्चा

धरणगाव जिल्हा जळगाव : धरणगाव शहरातील अमळनेर रस्त्यालगत शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमणाविरोधात गायरान बचाव मंचतर्फे मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 नोव्हेंबर रोजी सदर मुकमोर्चा धरणगाव तहसील कार्यालयावर शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. मोर्चानंतर 22 हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले जाणार आहे.

धरणगाव शहरातील अमळनेर रस्त्यालगत गट क्र. 1248 व 1248/1, 1248/2 मधील गायरान जमीन 3 हेक्टर 51 आर असून त्या जागेचा पुर्वापार गायरान जमीन म्हणून वापर केला जात आहे. या जागेचा सातबारा उता-यावर गायरान जमीन म्हणून उल्लेख आहे. मात्र या जागेवर मुंबई येथील संस्थेला स्थानिक व्यक्तींनी हाताशी धरुन बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला जात आहे. या जागेचा बेकायदेशीर कब्जा करण्याच्या तयारीत संबंधीत व्यक्ती व संस्था असल्याचे म्हटले जात आहे. या जागेवर अतिक्रमण झाल्यास गुरांना चराईसाठी जागा शिल्लक राहणार नसल्याचे गायरान बचाव मंचचे म्हणणे आहे.

याप्रकरणी शासनदरबारी वेळोवेळी न्याय मागण्यात आला असल्याचे गायरान बचाव मंचचे म्हणणे आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी पशुधन पालक शेतक-यांनी 17 नोव्हेंबर रोजी मुकमोर्चाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती निर्मल आघाड्यांचे महामंडलेश्वर स्वामी जनर्दनहरीजी महाराज तसेच रामेश्वर येथील महंत प.पु. स्वामी नारायणाचार्य व श्री श्री 1008 महामंडलेश्वर ह.भ.प. भगवानदासजी महाराज यांचे आशिर्वचन लाभणार आहे. याबाबतची माहिती गायरान बचाव मंचचे संयोजक अमोल महाजन, सह संयोजक अ‍ॅड. राहुल पारेख, सदस्य शिरीष, अ‍ॅड. महेंद्र चौधरी, कन्हैय्या रायपूरकर, दिलीप महाजन आदींनी दिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here