रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे हिची कौतुकास्पद कला

गोंदिया (अनमोल पटले) : गोंदीया येथील सोनी फुलसुंगे या तरुणीची रांगोळीच्या माध्यमातून चित्र काढण्याची कला कौतुकास्पद ठरत आहे. विविध विषयावर रांगोळीच्या माध्यमातून चित्र काढण्याच्या जिद्दीतून तिने या कलेत प्राविण्य मिळवले आहे.

14 नोव्हेंबर या पंडीत नेहरु यांच्या जयंती दिनी अर्थात बाल दिनी तिने रांगोळीच्या माध्यमातून काढलेले चित्र लक्षणीय ठरले आहे. सोनी फुलसुंगे या तरुणीने अनेक देवी देवता, खेळाडू, सिने अभिनेता, महापुरुष यांचे रांगोळीच्या माध्यमातून पोस्टर तयार केले आहेत. पंडीत नेहरु यांच्या जयंती दिनी बाल दिनाच्या विषयावर काढण्यात आलेल्या पोस्टर रांगोळी चित्रासाठी सोनी फुलसुंगे हिला जवळपास सहा तासांचा कालावधी लागला होता. त्याकामी सात किलो रांगोळीचा वापर करण्यात आला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here