सिटी बस चालक-वाहकास महिलेची नाशिकला मारहाण

नाशिक : कारला धक्का लागल्याचे कारण पुढे करत महिलेची नाशिक सिटी बस चालक व वाहकास मारहाण करत धुडगुस घातल्याची घटना बसमधील सिसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोकुल काकड यांनी म्हसरुळ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

या घटनेत महिलेसह चौघे जण बसमधे शिरले असल्याचे दिसून आले आहे. या घटनेप्रकरणी चौघांना म्हसरुळ पोलिसांनी अटक केली आहे. म्हसरुळ बोरगड परिसरात शनिवारच्या दिवशी घडलेल्या या घटनेने बसमधील वातावरण तंग झाले होते. घटनेच्या दिवशी गोकुळ काकड हे सिटीलिंक बसवर (एमएच 15 जीव्ही 7870) चालक म्हणून कार्यरत होते. नाशिक रोड ते बोरागड दरम्यान कांसारा माता चौकात हा प्रकार घडला. समोर उभ्या असलेल्या कारला धक्का लागेल असे सांगत काकड यांनी म्हटले होते. कारमधील आदित्य चौधरी, मयुर वाघ, रमेश जाधव, प्रशांत गांगुर्डे यांनी रागाच्या भरात महिलेसह बसमधे घुसून दोघांना मारहाण केली. स.पो.नि. वाघ पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here