मोटारसायकलच्या धडकेत विवाहीता ठार

जळगाव : शौचास जाणा-या गर्भवती विवाहितेला भरधाव वेगातील मोटार सायकलस्वाराने उडवल्याने उपचारादरम्यान निधन झाले. 14 नोव्हेंबरच्या रात्री जळगाव तालुक्यातील वावडदा येथे सदर घटना घडली. या घटनेप्रकरणी परिसरात शोककळा पसरली.

वावडदा येथील रहिवासी दिपक दयाराम गोपाळ या तरुणाची गर्भवती पत्नी ज्योती गोपाळ व त्याच्या दोघी बहिणी अशा 14 नोव्हेंबरच्या रात्री रस्त्याच्या कडेने शौचास जात होत्या. त्यावेळी सुपडू विक्रम गोपाळ याने त्याच्या ताब्यातील भरधाव वेगातील मोटार सायकलचा धक्का ज्योती गोपाळ या गर्भवती विवाहितेला लागला. या धडकेत सदर विवाहिता मोठ्या प्रमाणात जखमी झाली. सदर विवाहितेस उपचारार्थ सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here