बनावट दारुच्या कारखान्यावर धुळे पोलिसांचा छापा

धुळे : अवैध मद्याची निर्मीती करुन त्याचा साठा व विक्री करणा-या कारखान्यावर धुळे पोलिसांनी आज धाडसी छापा घातला आहे. या छाप्यात बनावट देशी दारु बॉटल सिलींगच्या दोन मशिन, बनावट देशी दारुने भरलेल्या बाटल्यांचे 22 खोके, 105 लिटर स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, दोन मोटार सायकली, चार मोबाईल, 120 लिटर सुटी बनावट दारु व ती तयार करण्याकामी लागणारे रंगीत रसायन वगैरे साधने असा एकुण 3 लाख 27 हजार 286 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे शहरातील प्लॉट क्रमांक 13 मधील सुरतवाला बिल्डींगमधील कृष्णाई या घरात टाकण्यात आलेल्या छाप्यात दोन इसम व दोन महिला अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य सुत्रधार मयुर शार्दुल हा पलायन करण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि दादासाहेब पाटील, पोहेकॉ  विलास भामरे, पोहेकॉ  मुक्तार मन्सुरी, पोहेकॉ  सतिश कोठावदे, पोशि  मनिष सोनगिरे, पोशि प्रविण पाटील, पो.कॉ. निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, पो.कॉ. शकिर शेख, चालक सुभाष मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

केलेली आहे .

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here