बुलेट चोरीची कबुली देणारे दोघे अटक

जळगाव : बुलेट चोरी करणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शुभम उर्फ कोयता शेखर पाटील (19) रा. पंढरपूर नगर गोदावरी कॉलेज जवळ जळगाव आणि ऋतिक राजेंद्र काकडे (20) रा.इंदिरा नगर खेडी असे दोघांची नावे आहेत. यातील शुभम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा आणि शस्त्र अधिनियम विरोधात गुन्हा दाखल आहे. तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशनला शस्त्र अधिनियम विरोधात आणि चोरीचा गुन्हा दाखल आहे.


गेल्या 14 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील हनुमान नगर परिसरातून राजेंद्र नवल पाटील यांच्या मालकीची बुलेट चोरीला गेली होती. याबाबतीत एमआयडीसी पोलिसात 16 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीच्या तपासात शुभम आणि ऋतिक या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सदर बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे आरोपितांना सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी खेडी येथून काल रात्री ताब्यात घेतले.त्यांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. अटकेतील दोघांना न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. सरकारच्या वतीने तर्फे अँड. स्वाती  निकम यांनी कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here