तृतीयपंथी तरुणाने संपवली जीवनयात्रा

जळगाव : जळगाव शहराच्या रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तृतीय पंथीय तरुणाने दुपारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. विक्रम मनोहर खारका (22) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव असे गळफास घेणाऱ्या तृतीयपंथीचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

मयत अवस्थेत त्याला नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. डॉ. खनिदा पठाण यांनी दिलेल्या खबरीनुसार या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विक्की जान या नावाने मयत विक्रम परिसरात परिचित होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here