बँकेच्या तिजोरीतील सोने चोरणा-या तिघांना अटक

जळगाव : कर्जदारांनी तारण ठेवलेले 3655.97 ग्रॅम वजनाचे 31779850 रुपये किमतीचे सोने बँकेच्या तिजोरीतून चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भडगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या तपासाअंती अटक केली आहे.

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत हा चोरीचा प्रकार 22 व 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान बँक बंद असतांना घडला होता. अज्ञात चोरट्यांनी बँकेचे बाहेरील व आतील दरवाज्याचे कुलुप काढून आत प्रवेश करत सदर चोरीचा प्रकार केला होता. बँकेतील तिजोरीत तारण म्हणून दोन चौकोनी आकाराच्या स्टिलच्या डब्यात सोन्याचे दागीने असलेला हा किमती मुद्देमाल तथा ऐवज होता. बाजारभाव मुल्याप्रमाणे 31779850/- रुपये किंमतीचे 3655.97 ग्रॅम वजनाचे सोने तसेच 10000/- रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिव्हिआर व बँकेच्या बाहरेच्या मेनगेटला लावलेले मात्र 200 रुपये किंमतीचे कुलुप असा एकुण 31790050/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा-आमडदे ता. भडगांव, शाखा व्यवस्थापक तन्मय अजय देशपांडे (30), रा. जळगाव यांनी भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आज गुन्हा नोंद करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासात राहुल अशोक पाटील (24), विजय नामदेव पाटील (39), बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील (37) तिघे रा. आमडदे ता. भडगांव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भडगाव पोलिस स्टेशनचे पो.नि.अशोक उतेकर व त्यांचे सहकारी सपोनि चंद्रसेन पालकर, पोउनि दत्तात्रय नलावडे, सफौ कैलास गिते, पोहेकॉ विलास पाटील, पोहेकॉ नितिन राउते, पोना किरण पाटील, पोना ज्ञानेश्वर महाजन, पोकॉ स्वप्निल चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी सफौ अशोक महाजन, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोना रणजित जाधव, पोना प्रीतम पाटील, पोना किशोर राठोड, पोकॉ विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ उमेश गोसावी, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख यांनी तपासात झोकून देत सहभाग घेतला व गुन्हा उघडकीस आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here