फुले मार्केटमधे उघड्या विज तारांचे पसरले जाळे —भविष्यात आगीला दिले जात आहे निमंत्रण काळे

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात महात्मा फुले मार्केट असून ते सर्वात जुने आणि प्रसिद्ध व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलात सर्वत्र लोंबकळणा-या विज तारांचे जाळे पसरल्याचे विदारक दृश्य ग्राहकांच्या नजरेस पडते. या पसरलेल्या विजेच्या तारांचा गोतावळा भविष्यात एखादी हानीकारक घटना घडवू शकते असे खेदाने म्हटले जात आहे.

या उघड्या आणि लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा जणू काही एखाद्या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या तारा असल्याचे संकेत वर्तवले जात आहे. फायर ऑडीटचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जळगाव शहराची ओळख फुले मार्केटच्या माध्यमातून सर्वत्र पसरली आहे.

या व्यापारी संकुलात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अतिक्रमण करणा-या हॉकर्समुळे या गर्दीत अजून भर पडत असते. प्रत्येक हॉकर्सच्या मागे कुणीतरी गॉडफादर लपलेला असतो. त्यामुळे या हॉकर्सची मुजोरी दिवसागणिक वाढत असते. तसेच या हॉकर्सची संख्या देखील कायम वाढत्या स्वरुपात असते. अतिक्रमण विरोधी पथकाची ट्रक कित्येकदा रस्ता अडवून उभी असते व अतिक्रमणधारक हॉकर्सचा व्यवसाय देखील बिनबोभाट सुरुच असतो हे लोक उघड्या नजरेने बघत असतात.

या मार्केट मधील अनेक जागा अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केल्या असून त्याकडे मनपा प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे लोक उघडपणे बोलत आहेत. फुले मार्केट आणि काँग्रेस भवनची भिंत यांच्या मधून जाणारा रस्ता काही अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी गिळंकृत केला असल्याचे म्हटले जात आहे. या जागेच्या नकाशात खरोखरच रस्ता आहे काय? या रस्त्याचा शोध घेण्याची गरज असल्याचे देखील म्हटले जात आहे. या संपूर्ण मार्केट मधे विजेच्या लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांचा गहन प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अन्यथा एखाद्या दिवशी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. फायर ऑडीटचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here