कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार, महिलेस अटक

घरफोडी

उल्हासनगर : कोरोनावर गुणकारी ठरलेल्या अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार उल्हासनगरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. हा काळाबाजार करणाऱ्या एका महिलेस काल रात्री अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या सहा हजाराहून अधिक झाली आहे. कोरोनावर प्रभावशाली ठरलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार सध्या सुरु आहे. होत आहे. कॅम्प नं-३ मनीषनगर भागातील एक रहिवासी महिला अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला समजली होती.

या विभागाच्या निशिगंधा पाष्टे यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने निता पंजवाणी यांच्या घरावर रात्री धाड टाकली. या धाडीत निता पंजवाणी या सिपला कंपनीचे अॅक्टेमरा टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करत असल्याचे आढळून आले. ४०,५४५ किंमत असलेले हे इंजेक्शन तब्बल ६० हजार रुपयांना विक्री केल जात असतांना पथकाला आढळून आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महिलेस रंगेहाथ पकडले. निशिगंधा पाष्टे यांच्या तक्रारीनुसार निता पंजवाणी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here