साठ हजाराच्या लाचेत अडकला कंत्राटी डॉक्टर

ACB-Crimeduniya

जळगाव : शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे बिल काढण्याकामी लागणारे पत्र उपलब्ध करुन देण्याकामी साठ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णवाहिकेवरील डॉक्टरला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मुश्ताक मोतेबार सैय्यद (38), रा.घाट रोड,चौधरी वाडा,चाळीसगाव जि.जळगाव असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या कंत्राटी डॉक्टरचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) आहेत. कोरोना काळात चाळीसगाव तालुक्यासह चाळीसगाव येथून जळगाव येथे रुग्णांची ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव येथे रुग्णवाहिका भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहीकांच्या बिलांची पडताळणी करुन त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांच्या सही शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव यांचेकडून पडताळणीसह देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 108 रूग्णवाहीकेवरील कंत्राटी डॉ. मुश्ताक सैय्यद यांनी साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेची रक्कम स्वतः डॉ. सैय्यद यांनी त्यांच्या खासगी सैय्यद क्लिनिक घाटरोड चाळीसगाव येथे स्वीकारली.
लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने डॉ. सैय्यद यास रंगेहाथ ताब्यात घेतले.

पर्यवेक्षण अधिकारी तथा डीवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here