तलवार बाळगणा-यास अटक

जळगाव : तलवार सोबत घेऊन फिरणा-या इसमास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. समीर शहा शरीफ शहा फकीर (20) रा, रायपुर कुसूंबा, ता.जि.जळगाव असे तलवारीसह अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना. सुधीर साळवे, पोना. हेमंत कळसकर, पो.ना. योगेश बारी, सुधीर साळवे, पोकॉ. किशोर पाटील, पोकॉ मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पो.कॉ. सतीष गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here