नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील मुळ रहिवासी असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. अमोल हिम्मतराव पाटील (30) असे जवानाचे नाव आहे. विजेच्या तारांचा धक्का लागल्याने अमोल याचा मृत्यू झाला आहे.

सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर अमोल कर्तव्यावर असतांना हा प्रकार घडला. मकर संक्रांतीच्या दिवशी अमोलसह अन्य दोघांना देखील वीरमरण आले आहे.

सहा वर्षांपूवी सशस्त्र सीमा बलात दाखल झालेला अमोल दिवाळी सणाच्या वेळी आपल्या गावी बोलाठाण येथे आला होता. त्यावेळी त्याने परिवाराला सोबत नेले होते. अमोल यास पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणले जाणार असून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here