महाराष्ट्र शासनाचा लोगो एसटी अधिकाऱ्यांनी काढण्याची मागणी

जळगाव : एसटी महामंडळ असतांना एसटीचे अधिकारी त्यांच्या वाहनावर महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरत असल्याचे लक्षात आल्याने संपकरी कामगारांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले आहे. या अधिका-यांनी आपल्या वाहनावरील महाराष्ट्र शासनाचा लोगो काढण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

विभाग नियंत्रक व विभागीय कार्यशाळा यांच्या अखत्यारीत असलेल्या वाहनांवर “महाराष्ट्र शासन” असे लिहिण्यात आले आहे. शासनाचा एकही अधिकारी याठिकाणी नसून सर्व एसटी महामंडळ अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे शासनाच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे. खासगी शिवशाही बसवर असलेला राज्य परिहवन मंडळाचा लोगो देखील काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल या माध्यमातून होत असल्याची भावना जनतेत या निमित्ताने निर्माण झाली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here