पो.नि. अरुण धनवडे नियंत्रण कक्षात

जळगाव : कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहणारे पो.नि. अरुण धनवडे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. पो.नि. अरुण धनवडे यांची पहूर पोलीस स्टेशन येथून नियंत्रण कक्षात कसुरीवरुन बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रताप इंगळे यांची बदली करण्यात आली आहे. याशिवाय इतर पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. इतर बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि कंसात बदलीचे ठिकाण दर्शवले आहे.

प्रताप इंगळे – भुसावळ शहर पो.स्टे. (पहूर पो.स्टे), गजानन लक्ष्मण पडघन – आर्थिक गुन्हे शाखा (भुसावळ शहर पो.स्टे.), दिलीप पांडुरंग भागवत – बाजारपेठ पो.स्टे. (आर्थिक गुन्हे शाखा), राहुल बाबासाहेब गायकवाड – बोदवड पोलीस स्टेशन (बाजारपेठ पो.स्टे.भुसावळ), राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ – नियंत्रण कक्षा (बोदवड पो.स्टे.)

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here