बांधकाम साहित्य चोरी करणारा अटकेत

जळगाव : जळगाव औरंगाबाद रस्त्यावर सुरु असलेल्या हॉटेल बांधकामावरील किमती साहित्याची चोरी करणा-या चोरट्यास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. लखन दशरथ बाविस्कर रा. राम नगर जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी जळगाव शहरातील हॉटेल फोर सिझन जवळ लखीराम जेठानी यांच्या सुरु असलेल्या नवीन हॉटेलचे बांधकाम साहित्य चोरी झाले होते. या प्रकरणी साईट व्यवस्थापक योगेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकूण 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झालेल्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे लखन दशरथ बाविस्कर (रा. राम नगर, जळगाव) याच्या शोधार्थ पथकाची निर्मिती करण्यात आली होती. स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, हेमंत कळसकर, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, सतिष गर्जे, निलोफर सैय्यद आदींनी लखन बाविस्कर यास रामा नगर मेहरुन परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी चाळीस हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या विविध रंगाच्या व मापाच्या वायरींचे तुकडे, सिसीटीव्ही कॅमे-यात वापरल्या जाणा-या केबलचे तुकडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्या.ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.अटकेतील लखन याचाविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here