सात वर्षापासून फरार आरोपीस अटक

जळगाव : रिक्षात बसलेल्या पाळीव कुत्र्यास हटकणा-या व्यक्तीस शिवीगाळ करत दगडाने जखमी करणा-या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ऑक्टोबर 2015 मधे याप्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सात वर्षापासून या घटनेतील आरोपी फरार होता. गिरीष अशोक गायकवाड (न्यु जोशी कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या कुत्रामालक आरोपीचे नाव आहे. सुरेश गायकवाड या रिक्षाचालकाच्या फिर्यादीनुसार या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

6 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गिरीष अशोक गायकवाड याचा पाळीव कुत्रा सुरेश मधुकर गायकवाड याच्या रिक्षात बसला होता. रिक्षात कुत्रा बसल्याचा राग आल्याने त्याला सुरेश गायकवाड याने त्याला हटकले होते. त्यानंतर गिरीष गायकवाड याने सुरेश गायकवाड व त्याच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करत दगड मारुन जखमी केले होते. सात वर्षापासून फरार असलेला गिरीष गायकवाड जळगाव शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी त्याला अटक केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here