दोन हजार रुपयांची लाच दोघांना भोवली

जळगाव : विद्यार्थ्यांचे अनुदान मिळण्याकामी अनुकुल अहवाल जिल्हा परिषदेत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच एकाने मागीतली व दुस-याने स्विकारली. या घटनेत दोघांवर जळगाव एसीबीच्या कारवाईचा फास आवळला गेला आहे. अशोक दामु बि-हाडे असे (गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय धरणगाव) असे लाच मागणा-याचे नाव आहे. तसेच तुळशिराम भगवान सैंदाणे (कंत्राटी शिक्षण तज्ञ पंचायत समिती, गट साधन केंद्र,धरणगाव. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी,चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव) असे लाचेचा स्विकार करणा-याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या मालकीची धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथे शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. सन 2016 पासुन आजपर्यंत सदर शाळा स्वयं अर्थसहाय्यता तत्वावर सुरु आहे. शासनाच्या राईट टु एज्युकेशन या योजनेप्रमाणे 25% विद्यार्थी शाळेत भरावयाचे असतात. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे आठ हजार रुपयांचे वार्षीक अनुदान मंजुर करत असते. सदर शाळेतील सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात आरटीई या योजने अंतर्गत शाळेत 17 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

प्रति विद्यार्थी 8 हजार रुपये याप्रमाणे 17 विद्यार्थ्यांचे 1लाख 36 हजार रुपये प्रतिपूर्ती अनुदानाची रक्कम झालेली आहे. सदर अनुदान मंजूर होण्यासाठीचा अनुकूल अहवाल तयार करुन जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठवून देण्याच्या मोबदल्यात अशोक बि-हाडे यांनी लाचेची मागणी केली होती. या लाचेचा स्विकार बि-हाडे यांच्या सांगण्यावरुन तुळशीराम सैंदाणे यांनी कार्यालयात केला.

जळगाव एसीबीचे डीवायएसपी शशिकांत एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here