राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतर्फे सदस्यता नोंदणीला सुरुवात

जळगाव : जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानास शहरातील खोटे नगर भागातून सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते फित कापुन या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) भैय्यासाहेब  रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, महिला आघाडीच्या महानराध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, विनोद  देशमुख, योगेश देसले, वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, दुर्गेश पाटील, मजहर पठाण, अकील पटेल, ॲड. कुणाल पवार, रहीम तडवी, अशोक सोनवणे, सौ.आशा अंभोरे, जीतू बागरे, संजय हरणे, संजय जाधव, मुविकोराज कोल्हे, राहुल टोके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुशील शिंदे, सूर्यकांत भामरे, दिप पाटील, कुणाल ठाकूर, शुभम हिरे यांनी केले. या सदस्यता नोंदणी अभियानात खोटे नगर परिसरातील 193 नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here