चोरीच्या ट्रकसह आरोपीला अटक

अहमदनगर : उसाने भरलेला ट्रक रिकामा झाल्यानंतर झालेल्या चोरी प्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 22 जानेवारी रोजी साईकृपा शुगर हिरडगाव येथे हा चोरीचा प्रकार घडला होता. या ट्रक चोरीचा तपास श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पो.नि. रामराव ढिकले यांच्या गुन्हे शोध पथकातील सहका-यांनी लावला आहे.

भारत विष्णु धोत्रे, सतीश शिवाजी दरेकर आणि पोपट विठ्ठल आबनावे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी चोरी केलेला व लपवून ठेवलेला ट्रक यवत येथून काढून दिला आहे. या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ (एमएच 12 सीएन 10) असा एकुणा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here