जुगार अड्ड्यावरील कारवाईत साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत मेहरुण तलाव परिसरात 26 जानेवारीच्या सायंकाळी जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला. रात्री दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात एकुण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच संशयीत अटक करण्यात आले आहेत. भुषण समाधान कोळी (20, रा. तुकाराम वाडी, जळगाव, किशोर चिंतामन भोई (38) रा. तांबापुरा,जळगाव, गजानन समाधान हटकर (35) रा. गवळी वाडा. तांबापुरा, योगेश भागवत जाधव (23) रा. अदित्य हॉटेल रामेश्वर कॉलनी जळगाव तसेच दिपक किसन सोनवणे (41) रा. देव्हारी उमाळा ता.जि.जळगाव असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकुण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, योगेश बारी, आरसीपी प्लाटूनचे पो.कॉ. महेश महाले, रविंद्र मोतीराया, ज्ञानेश्वर खराडे, गोपाल सोमवंशी, चंदन दराडे, भूषण नन्नवरे, गणेश बढे, रूपेश पाटील, रमेश जाधव, अंकूश पवार तसेच पोलीस मुख्यालयातील कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here