कचऱ्यात आढळली दीड क्विंटल वजनाची तोफ

औरंगाबाद : दिड क्विंटल वजनाची तोफ औरंगाबाद शहरातील कच-यात गुरुवारी आढळून आली असून ती सिडको पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. कच-यात आढळलेली तोफ पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिली जाणार  आहे. या तोफेला उचलण्यासाठी दहा ते बारा लोकांचे मनुष्यबळ लागले.

चोरट्यांनी पुरातत्व विभागातून सदर तोफ चोरुन आणली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तोफेला कुणी खरेदीदार घेण्यास तयार झाला नसावा असे देखील म्हटले जात आहे. अखेर चोरट्यांनी या तोफेला कच-यात टाकून पलायन केले असावे. परिसरातील भंगार व्यावसायीकांची याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here