महिलेला आयटमची मागणी केली फोनवर?– शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण रस्त्यावर!

मुंबई : मुंबईच्या विरार पूर्व भागातील साईनाथ नगर परिसरात शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेने भर रस्त्यात चपलेने चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. जितू खाडे असे रिक्षात मारहाण झालेल्या व नंतर फरार झालेल्या शिवसेना विभाग प्रमुखाचे नाव सांगितले जात आहे. शरीरसुखासाठी फोनवर आयटम अर्थात महिलेची मागणी खाडे याने केली असल्याचा महिलेचा आरोप आहे.

या आरोपाच्या बळावर तिने रिक्षात बसलेल्या खाडे यास चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत विरार पोलिस स्टेशनला महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार जितू खाडेचा शोध घेतला जात आहे. दरम्यान जितू खाडे याची कृती निंदनीय असून याप्रकरणी आपला पाठींबा नाही. वरिष्ठांसोबत बोलणी करुन कारवाई केली जाणार असल्याचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here