डीआयजी पथकाच्या सट्टा पेढीवरील कारवाया सुरुच

धुळे : विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकाने काही दिवसांपुर्वी धुळे शहरातील सट्टा पेढ्यांवर कारवाया केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बुधवारी टाकण्यात आलेल्या छापेमारीत कारवाया करण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील सट्ट्याचे अड्डे बंद असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात येतो. मात्र सट्ट्याच्या पेढ्या नेहमीच सुरु असतात हे वेळोवेळी टाकण्यात आलेल्या धाडीतून दिसून आले आहे.

धुळे शहरातील रथगल्ली व फॉरेस्ट ऑफीस समोर असलेल्या परिसरात छापे टाकण्यात आले. रथगल्ली-बालाजी मंदीर अग्रवाल पापड उद्योग समोर सुरु असलेल्या धाडीत पेढी मालक अमित आत्माराम सोनार रा.धुळे यांच्यासह सजंय बन्सीलाल आहिरराव रा.धुळे, मनोज शिवराम पितांबरे, दिनेश अबादास यादव, अमर भगवान चौधरी, नितिन सुभाष दराडे आदींवर कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 7 हजार 500 रुपये रोखीसह एकुण 21 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फाँरेस्ट आँफिस समोर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकुण बारा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मनोज किसन गवळी रा.धुळे, भिकन वाल्मिक चिनोके रा.धुळे तसेच इतरांवर करण्यात आलेल्या कारवाईत तिन मोबाईल, 24 हजार 400 रुपये रोख असा एकुण 32 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांप्रकरणी आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here