जनमत प्रतिष्ठानच्या वतीने शालेय वस्तूंचे वितरण

जळगाव : जनमत प्रतिष्ठानच्या वतीने स्व. किसन पुना नाले यांच्या स्मरणार्थ गाडेगाव येथील जिल्हा परिषद संचलीत मराठी मुलांच्या शाळेतील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. शालेय मुलांना बॅचेस आणि टायचे वितरण करत असतांना त्यांच्या चेह-यावर हास्य फुलले होते. भविष्यात मराठी शाळेत विविध उपक्रम राबवणार असल्याचे जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी याप्रसंगी सांगीतले.

मराठी शाळेचे आस्तित्व दिवसेंदिवस कमी झाले असून आपण आपली मातृभाषा विसरुन कसे चालेल असे यावेळी बोलतांना पंकज नाले म्हणाले. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे ऋण आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे असे शिक्षक विजय चौधरी यांनी यावेळी आवर्जून कथन केले. तसेच निलेश बाक्षे यांच्याकडून मुलांना बेल्ट तसेच कुलकर्णी सरांकडून बालवाडीच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या विजय चौधरी, सोपान लोखंडे, भारंबे मॅडम, पवार मॅडम, सौ. खुशबूताई कोल्हे, पोपट मोरे, सुनीता कुरकुरे, सुरेखा बोरोले, अश्विनी धांडे, प्रा. विजय वानखेडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले तसेच ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आभार व्यक्त केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here