हुक्का पार्लरवर नाशिकला कारवाई

नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : नाशिक तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी सुरु असलेल्या अवैध हुक्का पॉर्लरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चांदशी आणि जलालपुर अशा दोन गावांच्या शिवारात या कारवाया झाल्या आहेत. हॉटेल स्टड फार्म असे चांदशी शिवारात आणि हॉटेल रायबा असे जलालपुर शिवारातील कारवाई झालेल्या हॉटेलची नावे आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले. हॉटेल स्टड फार्म येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात जमीर हुसेन शेख (रा. सनस्टार अवेन्यु बिल्डींग चांदशी ता.जि.नाशिक) व समाधान रामनाथ शिंदे (रा. वाढोली ता.त्रंबकेश्वर जि. नाशिक व मनोज कारभारी दिवे (रा. चांदशी ता.जि.नाशिक) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या तिघांनी प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का सेवनासाठी ग्राहकांना पुरवत त्यांना जागा उपलब्ध करुन दिली. या छाप्यात तिन हुक्का पॉट, तंबाखुजन्य सुगंधी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर व इतर हुक्क्याचे साहित्य व साधने असा एकुण 4 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुस-या पथकाने जलालपुर गावाच्या शिवारात हॉटेल रायबा येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात कुणाल राजेंद्र म्हैसधुपे (रा. मु.पो.मुंगसरा ता.जि.नाशिक -हॉटेल मालक) व मोहन गपेश घुगे (रा. श्रीभवन रेसिडन्सी, फ्लॅट नंबर 1, हिरावाडी रोड, महाराष्ट्र कॉलनी, पंचवटी, नाशिक) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलि. यांच्या ताब्यातून 8 हुक्का पॉट, तंबाखुजन्य सुगंधी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर व इतर हुक्क्याचे साहित्य व साधने असा एकुण 10 हजार 840 रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
या दोन्ही कारवायांबाबत नाशिक तालुका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिगरेट व तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणी व्यापार, वाणिज्य व्यवहार आणी उत्पादन, पुरवठा व वितरण याचे विनिमय) अधिनियम 2003 चे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4 (अ), 5 व 21 (अ) चे उल्लंघन नुसार दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती सारीका अहिरराव पुढील तपास करत अहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here