चौघा चोरट्यांकडून तिन मोबाईल हस्तगत

जळगाव : मोबाईलधारकांच्या हातातील मोबाईल हिसकावत पलायन करणा-या चौघांना अमळनेर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तिन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील चोरटे पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ(21) रा. दंडेवाले बाबा नगर धुळे, रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (20) रा. पवन नगर चाळीसगाव रोड धुळे, शेख सेहजाद शेख साहीद हसन (21) रा. जाफर नगर मालेगाव, शेख शकील रईस अहमद (21) रा. जाफर नगर मालेगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अमळनेर पोलिस स्टेशनचे पो.नि.जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोलिस नाईक शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, पो.कॉ. राजेंद्र देशमाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here