नववीच्या विद्यार्थ्याची जळगावला आत्महत्या

jain-advt

जळगाव : ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणादरम्यान विविध अडचणींचा सामना करत असतांना अभ्यासाचे आकलन न झाल्यामुळे नववीच्या विद्यार्थाने थेट गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. जळगाव शहराच्या इंद्रप्रस्थ नगरातील प्रेम प्रविण सोनवणे असे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. सेंट लॉरेन्स स्कुलचा चौदा वर्षाचा तो विद्यार्थी होता.

गुरुवारी प्रेम हा परिक्षेचा पेपर दिल्यानंतर घरी आला. त्यावेळी त्याचे वडील बाजारात गेले होते. घरात प्रेम, त्याची आई व लहान बहीण असे असतांना त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. ऑनलाईन शिक्षण कालावधीत ऑफलाईन शिक्षणाची सवय तुटली. दरम्यान त्याला अभ्यास आठवत नव्हता. ऑफलाईन शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत करावा लागणारा जास्तीचा अभ्यास, पाठांतर न होणे अशा समस्यांना  तो तोंड देत होता. या सर्व समस्या त्याने बहिणीला सांगितल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here