पत्नीचे अश्लील फोटो पतीने केले व्हायरल

jain-advt

जळगाव : पारोळा शहरातील एका पतीने आपल्याच पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल  केल्याचे उघड झाले आहे. पिडीत पत्नीने याप्रकरणी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पतीने त्याच्या पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून नको त्या अवस्थेत्य फोटो काढण्याच्या प्रकाराला पत्नीने विरोध केला. त्यामुळे पतीने तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. विवाहितेचे नातेवाईक तिला घेण्यासाठी आले असता सासरच्या मंडळींनी त्यांच्यासोबत वाद घालून तिच्यासह सर्वांचा अपमान केला. विवाहितेसोबत काढलेले नको त्या अवस्थेतील फोटो पतीनेच व्हायरल केल्याचे बघून तिच्यासह तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. याप्रकरणी पत्नीने पतिविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here