खान्देश रत्न पुरस्कार 2022 चे उत्साहात वितरण

जळगाव : सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट आयोजित खान्देश रत्न सोहळा येथील हॉटेल फोर सिझनमधे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची विशेष उपस्थिती होती. इतर मान्यवरांमधे अ‍ॅड. संजय राणे (अध्यक्ष जळगाव डिस्टिक लॉयर्स कंझ्युमर को ऑपरेटिव्ह सोसायटी जळगाव), अ‍ॅड. राजेश झाल्टे (संचालक झाल्टे बिल्डर्स), डॉ. श्रद्धा अमित माळी (माधवबाग हॉस्पिटल), किरण पातोंडेकर (संचालक पातोंडेकर ज्वेलर्स) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन उमा बागुल यांनी तर प्रास्ताविक अमित माळी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सप्तरंग इव्हेंट अँड मॅनेजमेंटचे संचालक आशुतोष पंड्या यांच्यासह पार्थ ठाकर, पंकज कासार, पवन कासार, नेहा शिंदे. प्रथमेश कासार आदींनी केले. खान्देशात विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणा-या व्यक्तींना खान्देश रत्न पुरस्कार देण्यात आला. यामधे टेनु बोरोले (शेती), भागवत महाजन (शेती), धीरज महाजन (उद्योजक), डॉ. अजित नांदेडकर (उद्योजक व सामाजिक), श्रीराम पाटील (उद्योजक व सामाजिक), राहुल पाटील (उद्योजक), डॉ. तेजांश कडू (उद्योजक), हिमांशू इंगळे (उद्योजक), विनोद पाटील (उद्योजक व सामाजिक), मीता बनवट (उद्योजिका), सौ. दीपमाला काळे (राजकीय व सामाजिक), डॉ. नितीन चौधरी (आरोग्यसेवा), डॉ. प्रविण पाचपांडे (आरोग्यसेवा), डॉ. संदीप जोशी (आरोग्यसेवा), डॉ. चंद्रकांत बारेला (आरोग्यसेवा), सौ. दिपाली देशमुख (योग व प्राणायाम), प्रतापराव पाटील (शासकीय व सामाजिक), सुरज नारखेडे (राजकीय व सामाजिक), सुनील चौधरी (सामाजिक व राजकीय), विपिन बोरोले (शिक्षण), नितीन थोरात (फोटोग्राफी), सौ. अंजली निलेश तिवारी (ब्युटीशियन), विजय नन्नवरे (सहकार क्षेत्र), मुकुंद गोसावी (सामाजिक), राहुल सूर्यवंशी (सामाजिक) आदींचा या पुरस्कारात समावेश होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here