पंजाबी पेहराव करुन ट्रकचालकास केली अटक

नंदुरबार : साखर कारखान्यात मळी वाहतुकीसाठी लावलेले दोन टॅंकर दोघा चालकांनी पळवून नेले होते. दोघांपकी एका चोरट्या टॅंकर चालकास पंजाब प्रांतातून अटक करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. टॅंकर चालकास अटक करण्यासाठी पोलिसांना पंजाबी पेहराव आणि नकली दाढी लावावी लागली. लोणखेडा येथून सुमारे 45 लाख रुपये किमतीचे हे दोन टॅंकर होते. अटकेतील बलविंदरसिंग यास नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा फरार टॅंकर चोरटा जोबनसिंग तरलोकसिंग याच्या मागावर पोलिस पथक आहे.

धानेगाव ता.नांदेड येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सुनीलसिंग रघुविशरसिंग काला यांनी त्यांचे दोन टँकर सातपुडा साखर कारखान्यात मळी वाहतुकीसाठी लावले होते. त्या टँकरवर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग व बलविंदरसिंग दोन्ही (रा.अमृतसर पंजाब) हे चालक म्हणून कामाला होते. या दोघा चालकांनी हे टँकर गयब केले होते. याप्रकरणी शहादा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदीप पाटील, दीपक गोरे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे आदींचे पथक पंजाबला तपासकामी गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here