शेतक-याची कपाशी चोरणा-या दोघांना अटक

जळगाव : सत्तर हजार रुपये किमतीच्या कपाशीची चोरी करणा-या दोघा चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नशिरोद्दीन युसूफ तडवी (29) आणि आशिक अजित तडवी (19) दोन्ही रा.पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला दाखल कपाशी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

चोरीच्या कपाशीचा माल वरखेडी येथील व्यापा-यास दोघा चोरट्यांनी विकला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तपास पथकाची निर्मिती करुन ते पथक रवाना केले होते. पथकाने दोघा चोरट्यांना शिताफीने वरखेडी येथून ताब्यात घेतले. दोघांनी पोलिसी हिसका बघून आपला गुन्हा कबुल केला. पोलिस पथकाने त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या 70 हजार रुपये किमतीच्या कपाशीपैकी 1 क्विटल ५२ किलो वजनाचा 11 हजार 245 रुपये किमतीचा कापूस हस्तगत करण्यात आला आहे. दोघांनी गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल व एक मालवाहू रिक्षा असा कपाशीसह एकुण 1 लाख 41 हजार 245 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी तपासकामी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर बारी, अशोक पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here