चोरी चोरी चुपके चुपके दोघे गाजवायचे रात्र!– रंगेहाथ सापडता शिवाजीची झाली काळरात्र!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क):  करिना (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. करिना आणि शिवाजी यांची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती. शिवाजी गोकुळ पारधी हा बोदवड तालुक्यातील मुक्तळ या गावचा रहिवासी होता. करिना ही भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी होती. महाविद्यालयीन जीवनापासून सुरु असलेली दोघांची मैत्री नंतर देखील कायम राहीली. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर करिनाचे लग्न ठरले. शिवाजी रहात असलेल्या गावातील तरुणासोबत तिचे लग्न ठरले. त्यामुळे दोघांच्या भेटी पुन्हा सुरु झाल्या होत्या. महाविद्यालयीन मित्र असलेल्या शिवाजीच्या गावातच तिचे सासर असल्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. वयाच्या विशीतच करिनाचे लग्न मुक्तळ येथील तरुणासोबत झाले होते. लग्नाच्या वेळी करिना साधारण विशीत होती. विशीतील तिचे तारुण्य वाखाणण्याजोगे होते. मात्र तिच्या पतीचे वय तिच्यापेक्षा सुमारे दहा वर्षांनी जास्त होते. तिच्यावर प्रेम करणारा तिचा महाविद्यालयीन मित्र शिवाजी हा तिच्यापेक्षा सुमारे आठ वर्षांनी मोठा होता. 

करिना आता विवाहीत झाली होती. विवाहानंतर ती मुक्तळ येथे राहण्यास आल्यामुळे तिची शिवाजीसोबत दररोज नजरानजर होण्यास वेळ लागत नव्हता. दोघे लपून छपून फिरायला देखील जावू लागले. वास्तविक करिना आता विवाहीत झाली होती. तिचा पती हेच तिचे सर्वस्व होते. मात्र अविवाहीत शिवाजीची प्रणयी नजर तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लग्नानंतर बघता बघता ती एक वर्षाच्या बाळाची आई झाली. ती आता एकविस वर्षाची झाली होती. विवाहीत करिनाचे सौंदर्य लाजवाब होते. एक वर्षाच्या बाळाची आई आणि वय अवघे एकवीस वर्ष असलेली करिना अजूनही फुल फॉर्मात आणी तरोताजा रहात होती. जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील मुक्तळ या छोट्याश्या गावात विवाहीत करिना एकत्रीत कुटूंबात रहात होती. घरात पती, सासु, सासरे, दीर असे सर्वच जण रहात होते.

शिवाजी गोकुळ पारधी हा 29 वर्षाचा अविवाहीत आणी उच्च शिक्षीत तरुण एकदम टीपटॉप रहात होत. गावच्या ग्रामपंचायतीचा तो सदस्य म्हणून निवडून आला होता. त्यामुळे गावात त्याचा चांगला मान मरतब होता. वार्डातील समस्या तो शासकीय पातळीवर सोडवत असे. उच्च शिक्षीत तरुण असल्यामुळे साहजीकच त्याचा गावात आणि ग्रामपंचायतीत चांगला वचक होता. कोरोना कालावधीत सामाजीक जाणीवेतून त्याने गाव परिसरातील मुलांना मोफत शिक्षण दिले होते.

अविवाहीत शिवाजी आणि विवाहीत करिना यांच्यातील नजरेच्या खेळात दिवसेंदिवस रंगत येत होती. शिवाजीच्या नजरेच्या एका बाणात विवाहीत करिना घायाळ होत असे. करिनाच्या प्रणयी नजरेचा बाण शिवाजीच्या दिलाच्या आरपार निघून जात असे. दोघांची दिल्लगी सुरु असतांना थंडगार वा-याप्रमाणे प्रेमाची शितल झुळूक येण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान प्रणयाचा धुर निघून वासनेची आग लागण्यास वेळ लागला नाही. एकमेकांच्या बाहुपाशात येण्यास दोघे आतुर झाले होते.

विवाहीत प्रेयसी आणि अविवाहीत प्रेमी रहात असलेल्या गावात महावितरणकडून लोडशेडींग सुरु झाले होते. या लोडशेडींग मुळे शेतातील पिकांना पुरेसे पाणी दिले जात नव्हते. बरीच प्रतिक्षा केल्यानंतर रात्री कमी अधिक प्रमाणात विज प्रवाह सुरु होत असे. त्यामुळे रात्री विज आल्यानंतर करिनाचा पती, सासू, सासरे व दिर असे सर्वजण लगबगीने शेतात जात होते. त्या कालावधीत करिना घरी एकटीच रहात होती. या संधीचा फायदा घेत करिनाच्या घरी शिवाजी जात असे. ती रहात असलेल्या घराच्या मागच्या दरवाजाने शिवाजी प्रवेश करत होता. तिचा पती, सासु – सासरे असे सर्वजण घरी येण्याच्या आत दोघे जण आपला कार्यभाग भराभर साध्य करुन घेत होते. आपला कार्यभाग साध्य झाल्यानंतर मागच्या दरवाजानेच शिवाजी पलायन करुन आपल्या घरी परत येत असे. शैय्यासोबतीचा दोघांचा असा चोरटा कार्यक्रम गेल्या कित्येक दिवसापासून अव्याहतपणे सुरु होता. गेल्या कित्येक दिवसांपासून शिवाजी आणि करिना यांच्यातील प्रेमाचा सिलसिला सुरु होता. वारंवार खंडीत होणा-या विज पुरवठ्याचा पुरेपुर फायदा शिवाजी आणि करिना उचलत होते. त्यामुळे दोघांचा रात्रकालीन शय्यासोबतीचा कार्यक्रम बिनदिक्कतपणे सुरु होता. शिवाजीने करिनाला एक मोबाईल सिमकार्ड विकत घेऊन दिले होते. पतीच्या गैरहजेरीत ती तिचे प्रचलीत सिमकार्ड काढून त्यात शिवाजीने दिलेले सिमकार्ड टाकत होती. त्या मोबाईल सिम क्रमांकावरुन दोघे आपसात बोलत असत. शिवाजीने तिच्याकडे केव्हा यावे अथवा येऊ नये, पती घरी आहे अथवा नाही या सर्व प्रश्नांचे उत्तर शिवाजीला त्या सिम क्रमांकाच्या माध्यमातून करिनाकडून समजत होते. ते सिम केवळ शिवाजी आणि करिना यांच्यातील संभाषणासाठीच सुरु होते.

4 मार्च 2022 हा शुक्रवारचा दिवस उजाडला. या दिवसाचा सुर्योदय आणि सुर्यास्त शिवाजीसाठी अखेरचा ठरला. या रात्री नेहमीप्रमाणे शिवाजीसह घरातील सर्वांनी जेवण वगैरे आटोपले. या रात्री नेहमीप्रमाणे विजपुरवठा सुरु होताच करिनाच्या पतीसह घरातील सर्वांची पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्याची लगबग सुरु झाली. सर्व जण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळाने दुसरा दिवस अर्थात 5 मार्च 2022 हा दिवस सुरु झाला. मध्यरात्री साडेबारा वाजता शिवाजीचा मोबाईल खणखणला. करिना घरी एकटीच असल्याचे त्याला समजले. तो बोलत बोलत नेहमीप्रमाणे तिच्या घराच्या मागच्या दरवाजाने आत गेला. शिवाजी येण्याची करिना वाटच बघत होती. घरात येताच कमी असलेल्या वेळेच्या मर्यादेचे भान ठेवून दोघांना आपला कार्यभाग साध्य करायचा होता. त्यामुळे दोघांनी पटापट नेहमीप्रमाणे शैय्यासोबतीला सुरुवात केली. दोघांचा शैय्यासोबतीचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. संभोगसुखाच्या सर्वोच्च शिखरावर दोघे स्वार झाले असतांना अचानक घरातील विजप्रवाह सुरु झाला. पुढच्याच क्षणी करिनाचा पती घरात दाखल झाला.

दोघांना नको त्या अवस्थेत बघून करिनाच्या पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांच्या संबंधाची गावात चर्चा सुरु होती. त्यामुळे करिना व तिच्या पतीचा वाद सुरु होता. आज मात्र दोघांना त्याने रंगेहाथ पकडले होते. काही वेळातच तिचे सासु – सासरे आणि दीर असे इतर सदस्य देखील घरात हजर झाले. आता सर्वांच्या तावडीत शिवाजी सापडला होता. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शिवाजीचा गावात मोठा मान सन्मान होता. मात्र आता तो करिनासोबत बिछान्यावर रंगेहाथ सापडला होता. इच्छा असूनही त्याला पळून जाणे शक्य होत नव्हते. तो सर्वांचा अपराधी बनून गुपचूप बसून होता. करिनाच्या आई वडीलांना आणि नात्यातील जवळच्या नातेवाईकांना तेव्हाच्या तेव्हा रातोरात फोन करुन बोलावून घेण्यात आले. आज शिवाजीला धडा शिकवायचा हे सर्वांनी मनाशी पक्के ठरवले होते. सर्वांनी मिळून शिवाजीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारा …. मारा.. काठ्या आणा…. असा एकच हल्लकल्लोळ माजला. काही वेळाने करिनाचे आई वडील रिक्षा घेऊन आले. करिनाचा पती आणी तिचे वडील यांच्या सामुहीक बेदम मारहाणीत शिवाजी बेशुद्ध पडला. शिवाजी मरण पावला असे सर्वांना वाटले. आता याचे काय करायचे हा प्रश्न सर्वांना सतावू लागला. रात्रीचे – पहाटेचे अडीच वाजले होते. त्यावेळी पुन्हा विज प्रवाह खंडीत झाला. अंधाराचा फायदा घेत आणि शिवाजी मरण पावला असे समजून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे सर्वांनी ठरवले.

shivaji pardhi

करिनाचा पती आणी तिचे वडील यांनी बेशुद्ध शिवाजीचे तोंड रुमालाने बांधून ठेवले. दोघांनी उचलून त्याला रिक्षात टाकले. कुणाला काही दिसू नये व समजू नये म्हणून रिक्षा ताडपत्रीने झाकून घेण्यात आली. रिक्षाने नेत त्याला मलकापूर रस्त्यावरील पुलाखाली फेकून देण्यात आले. शिवाजी अजून जीवंत होता. त्याच्या अंगात अजून कमी अधिक प्रमाणात जीव होता. त्यामुळे पुलाखाली फेकल्यानंतर तो किंकाळला. त्याच्या मुखातून एक किंकाळी बाहेर आली. शिवाजीच्या मुखातून जोरात आवाज आल्यामुळे तो जीवंत असल्याचे दोघांच्या लक्षात आले.  तेथे जवळच बिअरची एक रिकामी फुटलेली बाटली पडलेली होती. त्या फुटलेल्या बाटलीने त्याच्या मानेवर जबर वार करण्यात आला. फुटलेल्या काचेची धार गळ्यावर बसल्याने कमी अधिक प्रमाणात जीवाची तग धरुन असलेल्या शिवाजीने आपले प्राण काही वेळातच सोडले. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा करिनाच्या वडीलांनी व्याह्याच्या शेतातील नाल्यात लपवून ठेवली. परत येतांना वाटेत गाडरस्त्यात ताडपत्री, मयताच्या तोंडाला बांधलेला रुमाल व त्याचा मोबाईल जाळून नष्ट करण्यात आला. त्यानंतर दोघे घरी परत आले.

5 मार्च 2022 चा दुसरा दिवस उजाडला तरी देखील शिवाजी घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्य चिंतेत पडले. त्याच्या भावासह नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते शोधकार्य व्यर्थ ठरले. अखेर 6 मार्च रोजी शिवाजीचा भाऊ सुनिल पारधी याने बोदवड पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांची भेट घेत त्याने भाऊ शिवाजी बेपत्ता असल्याची व्यथा कथन केली. याप्रकरणी 4/22 या क्रमांकाने बेपत्ता शिवाजीची मिसींग दाखल करुन घेण्यात आली. मिसींग दाखल झाल्यानंतर देखील सुनिल पारधी व त्याचे नातेवाईक आपल्या पातळीवर शिवाजीचा शोध घेतच होते. दिवसभर शिवाजीचा शोध घेत थकून भागून घरी जात असतांना सुनिल यास सरपंचांचा फोन आला. पलीकडून बोलणारे सरपंच जितेंद्र पाटील यांनी सुनिल यास सांगितले की तुझा भाऊ शिवाजी हा बोदवड – मलकापूर मार्गावरील पुलाच्या खाली मयत अवस्थेत पडलेला आहे. सदर माहिती मिळताच सुनिल हा आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी दाखल झाला. त्याठिकाणी त्याला गर्दी दिसून आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे आपल्या सहकारी कर्मचा-यांसह तेथे अगोदरच हजर होते. पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह सुनिल यास दाखवताच तो धाय मोकलून रडू लागला. तो मृतदेह आपला बेपत्ता भाऊ शिवाजी याचा असल्याचे त्याने रडून कथन केले. शिवाजी याच्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती.

मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलिस तपासाचा निम्मा ताण कमी झाला होता. घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीकामी मृतदेह सरकारी दवाखान्यात रवाना करण्यात आला. मयत शिवाजीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. मयत शिवाजीचे गावातील करिनासोबत असलेल्या प्रेम प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागलेली होती. त्यामुळे तिच्यासह तिच्या नातेवाईकांवर संशय पोलिसांना सुरुवातीपासून होता. याप्रकरणी मयत शिवाजी पारधी याचा भाऊ सुनिल पारधी याने दिलेल्या फिर्यादीनुसार बोदवड पोलिस स्टेशनला एकुण नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्या संशयीतांमधे करिनासह तिचा पती, सासरा, दिर, चुलत दिर, सासु, करिनाचे आई – वडील व एक अल्पवयीन मुलगी अशा सर्वांचा समावेश करण्यात आला. बोदवड पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 26/22 भा.द.वि. 302, 201 व 34 नुसार दाखल करण्यात आलेल्या सदर गुन्ह्याचा तपास पो.नि. राजेंद्र गुंजाळ यांनी सुरु केला. पो.नि. राजेंद्र गुंजाळ यांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवत आपल्या सहका-यांच्या मदतीने सर्व संशयीतांना ताब्यात घेत अटक केली.  पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देत पो.नि. गुंजाळ यांना मार्गदर्शन केले. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी तपासकामी बोदवड येथे ठाण मांडले होते. त्यामुळे गावातील शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली होती. गुन्ह्याच्या तपासकामी ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाची मदत घेण्यात आली.

अल्पवयीन विधीसंघर्षीत बालिकेस बाल न्यायमंडळात हजर करण्यात आले. इतर सर्व संशयीतांना अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. संशयीतांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडी दरम्यान करिनाचा पती आणि तिचे वडील यांना पोलिसी खाक्या दाखवत गुन्ह्याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात वापरलेले तुटलेले सिम कार्ड, मोबाईलचे जळालेले अवशेष, बॅटरी (टॉर्च), रिक्षा, घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, रक्तमिश्रित माती व बिअरच्या बाटलीचे तुकडे, तुटलेली बिअरची बाटली आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे पुढील तपास करत आहेत. त्यांना पोलिस उप निरीक्षक शरद माळी, सहायक फौजदार सुधाकर शेजोळे, पो.हे.कॉ. वसंत निकम, पोलिस नाईक शशिकांत महाले, पोलिस नाईक सचिन चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. निलेश सिसोदे, पो.कॉ. निखिल नारखेडे, पो.कॉ. दिपक पाटील, पो.कॉ. मनोहर बनसोडे यांचे सहकार्य लाभत आहे.  (या कथेतील करिना हे नाव काल्पनिक आहे)

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here