“आमदार निवास”मधे बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी

jain-advt

पॉर्न सिनेमातून बॉलीवुडच्या दिशेने आलेली बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी आता प्रादेशिक सिनेमात देखील आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड सिने रसिकांना आपली अदा दाखवल्यानंतर ती आता मराठी सिनेमात झळकणार आहे.

निर्माता दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांच्या “आमदार निवास” या मराठी चित्रपटात ती आपली अदा दाखवणार आहे. यापुर्वी सनी लियोनी हिने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या गाण्यावर आपली नृत्यकला दाखवत मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती “आमदार निवास” या चित्रपटात “शांताबाई” या गाण्यावर थिरकतांना दिसणार आहे. शांताबाई या गिताला युट्युबवर जवळपास लाखो व्ह्युज मिळाले आहेत. कोरिओग्राफी करणा-या विष्णू देवा यांनी या आयटम सॉंगचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट “आमदार निवास” हा चित्रपट लवकरच चित्रपटात झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here