मी अनेक खून केले, फक्त ५० पर्यंत मोजले डॉक्टरने दिला खळबळजनक जबाब

पोलिसांच्या ताब्यातील आरोपी देवेंद्र शर्मा

नवी दिल्ली : चार राज्यांमध्ये पन्नासपेक्षा अधिक जणांचे खून करणाऱ्या डॉक्टरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या डॉक्टर आरोपीने अनेकांचे खुन केले आहेत. यात  मुख्यत्वे ट्रक आणि टॅक्सी चालकांचा समावेश आहे. चौकशी दरम्यान त्याने अनेक हत्या केल्याची कबुली दिली आहे. आपण आतापर्यंत केवळ पन्नास खुन मोजले आहेत. त्यानंतर मोजले परंतु ती मोजणी चुकली असल्याचा खळबळजनक जवाब या डॉक्टरने पोलिसांना दिला आहे.  देवेंद्र शर्मा असे या अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेह आपण नदीत फेकून द्यायचो. त्या नदीत मगरींची संख्या खूप असल्याचे देखील शर्माने पोलिसांना सांगितले आहे. बीएमएसची पदवी घेतलेला हा डॉक्टर आरोपी दिल्लीतील बापरोलामध्ये वास्तव्यास होता. दिल्ली पोलीस दलातील पोलिस निरीक्षक राममनोहर व त्यांच्या पथकाला देवेंद्र शर्माचा सुगावा लागला. त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

बासष्ट वर्ष वयाचा देवेंद्र मूळ अलीगढ येथील रहिवासी आहे. बिहारच्या सीवानमधून १९८४ साली त्याने बीएमएसची डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर त्याने जयपूर शहरात दवाखाना सुरू केला असल्याची माहिती पुढे आली आहे.

सन १९९४ मध्ये एका गॅस एजन्सीची डिलरशिप घेण्यासाठी देवेंद्र शर्माने ११ लाख रुपये खर्च केले. मात्र कंपनीतल्या लोकांनी त्याची फसवणूक केली. फसवणूकीतून झालेल्या नुकसानीची भरपाई वसुल करण्यासाठी देवेंद्रने सन १९९५ साली अलीगढमध्ये एक बोगस गॅस एजन्सी सुरु केली. सुरुवातीच्या काळात त्याने लखनऊ येथून काही सिलेंडर आणि गॅस शेगड्या आणल्या. त्यानंतर त्याला सिलेंडर आणणे अशक्य होवू लागले. दरम्यानच्या काळात तो उदयवीर, वेदवीर आणि राज या तिघांच्या संपर्कात आला. चौघे मिळून गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रक चालकांची हत्या करु लागले. त्यानंतर ते सिलेंडर आपआपल्या गॅस एजन्सीमध्ये घेवून जायचे. त्यानंतर मेरठला ट्रकच्या सुट्या भागांची विक्री करायचे.

बोगस गॅस एजन्सी चालवण्याच्या आरोपाखाली देवेंद्र शर्मा यास अटक झाली. मात्र जामीन मिळताच तो पुन्हा बोगस गॅस एजन्सीच्या कामात सक्रीय झाला. त्याने अमरोह्यात पुन्हा गॅस एजन्सी सुरु केली. त्यात तो पुन्हा पकडला गेला. त्यानंतर तो पुन्हा जामिनावर सुटून बाहेर आला. त्यामुळे त्याचे धाडस वाढत गेले. त्यानंतर त्याने दुसरा व्यवसाय सुरु केला. आता तो अवैध किडनी प्रत्यारोपन करणाऱ्या एका गॅंगमधे सामील झाला. त्याने जयपूर, वल्लभगढ आणि गुरुग्राममध्ये १२५ जणांच्या किडनी प्रत्यारोपन केल्या.

एका किडनी प्रत्यारोपणातून त्याला ५ ते ७ लाख रुपये मिळू लागले. सन २००४ मध्ये गुरुग्रामच्या अनमोल नर्सिंग होमवर पोलिसांनी रेड केली. त्यात किडनीचे अवैध प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या डॉ. अमितसह देवेंद्रला देखील अटक करण्यात आली. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत पन्नास पेक्षा जास्त  ट्रक चालकांचे खून केल्याचे त्याने सांगितले. यातील सात प्रकरणात त्याला शिक्षा झाली. जयपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत असतांना त्याला जानेवारीत महिन्यात विस दिवसांचा पॅरोल मिळाला. पॅरोलवर बाहेर येताच तो फरार झाला आणि दिल्लीत आला. यावेळी प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू करण्याचा नादात असतांना तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here