धारदार शस्त्राच्या हल्ल्यात तरुण जखमी

जळगाव : सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर तेथे हजर असलेल्या एकाने धारदार शस्त्राने हल्ला तर दुस-याने शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. 18 मार्च रोजी घडलेल्या या घटनेत आकाश गोकुळ पारे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोल्या ठाकुर व निशांत चौधरी अशा दोघांविरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश पारे हा तरुण तुकारामवाडी परिसरातील दत्त मंदीराजवळून जात होता. त्यावेळी त्याला भुषण माळी, अरुण गोसावी, गोल्या ठाकुर, निशांत चौधरी, स्वप्नील ठाकुर असे दिसले. त्यावेळी भुषण माळी आणि अरुण गोसावी यांच्यात वाद सुरु होता. आकाश याने दोघांना वाद घालू नका असे म्हटले. त्यावेळी माझ्याकडे का बघतोस असे म्हणत गोल्या ठाकुर नावाच्या तरुणाने आकाशला कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यावर हल्ला करत जखमी केले. त्याचवेळी निशांत चौधरी याने आकाशला शिवीगाळ करत बघून घेईन असे म्हटले. जखमी आकाश पारे याने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी गोल्या ठाकुर व निशांत चौधरी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्यातील आरोपी हे अल्पवयीन असून पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना शहरातील प्रजापत नगर भागातून ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, गणेश शिरसाळे, नाना तायडे, किशोर पाटील, मुकेश पाटील, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, योगेश बारी आदींनी त्यांना ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश सपकाळे करत आहेत. अल्पवयीन आरोपीवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here