आ. गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नात पाकीटमाराची धुलाई

जळगाव : भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येच्या लग्न सोहळ्यात घुसलेल्या पाकीटमाराला पब्लिक मार देण्यात आला. या घटनेने काही वेळ गोंधळ उडाला होता.

भाजपचे आ. गिरीश महाजन यांची द्वितीय कन्या श्रेया हिचा विवाह सोहळा जामनेर येथे आयोजीत करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात अनेक मंत्रीगण उपस्थित होते. या गर्दीत जामनेरच्या एका नगरसेवकाच्या खिशातील पाकीट मारण्याचा प्रयत्न एका चोरट्याने सुरु केला. मात्र हा प्रकार वेळीच त्या नगरसेवकाच्या लक्षात आला. त्याने पाकीटमार चोरट्याला पकडले. त्यानंतर पुढील भागात त्याला इतर कार्यकर्त्यांनी चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. उपस्थित पोलिस कर्मचा-याने त्याला आपल्या ताब्यात घेत त्याची तपासणी सुरु केली. दरम्यान जास्त गोंधळ नको म्हणून त्याला पब्लिक मारापासून वाचवण्यासाठी बाहेर शांततेत नेण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here