अनैतिक संबंधात अडसर ठरण-या तरुणाची हत्या

jain-advt

यवतमाळ : अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याच्या संशयावरुन यवतमाळ येथील तरुणाची दारु विक्रेत्या महिलेसह तिच्या साथीदाराने हत्या केल्याची घटना उघडकीस आले आहे. अटकेतील दोघा संशयीतांनी हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे. पुष्पा किन्नाके या दारु विक्रेत्या महिलेसह तिचा प्रियकर वसीम कुरेशी (दोघे रा. मनसावळी जिल्हा वर्धा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. वैभव खडसे रा. यवतमाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. दोघा संशयीतांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

दारु विक्री करणा-या पुष्पा किन्नाके हिचे वैभव खडसेसोबत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्याचे पुष्पाच्या घरी येणे जाणे होते. काही वर्षापूर्वी पुष्पाच्या घरात चोरीची घटना झाली होती. त्या चोरीच्या घटनेचा संशय पुष्पाने वैभववर घेत पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चोरीच्या गुन्ह्यात वैभव खडसे यास अटक झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा पुष्पाच्या घरी तिला भेटणे सुरु केले. वैभव कारागृहात असतांना वसीमचे पुष्पा कडे येणे जाणे सुरु झाले होते. आता वैभवचे तिच्याकडे येणे वसीमसह पुष्पाला खटकत होते. त्यातून दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here