मिलन मटका सट्टा जुगारावर कारवाई

जळगाव : मिलन मटका जुगारावर करण्यात आलेल्या कारवाईत एमआयडीसी पोलिस पथकाने गणेश मुरलीधर महाजन यास ताब्यात घेतले आहे. जळगाव – पहुर रस्त्यावरील इंडीयन पेट्रोल पंपाजवळ हा जुगार चालवला जात असल्याचे पो.नि.प्रताप शिकारे यांना समजले होते. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पो.हे. कॉ. विजय लोटन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

गणेश मुरलीधर महाजन (रा. आनंद नगर, जामनेर रोड, भुसावळ ह.मु. शिवकॉलनी, जळगांव) हा अमोल सपकाळे राजळगांव याच्या सांगण्यावरुन हा जुगार चालवत होता. सातशे तिस रुपये रोख व जुगाराचे साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here