धुळे येथे लागलेल्या आगीत चाळीस दुकाने भस्मसात

धुळे : धुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणारा पाचकंदील भागातील शंकर मार्केटला आज लागलेल्या आगीत चाळीस दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडले. दरम्यान आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमद दलाचा एक जवान खाली पडून गंभीर जखमी झाला. आगीच्या या घटनेमुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कापड व्यावसायीकांची या मार्केटमधे अनेक दुकाने आहेत. राधेश्याम रेस्टारंटच्या मागे असलेल्या हरिष सिंधी यांच्या कापड दुकानाला आग लागल्याचे प्रथम दिसून आल्याचे म्हटले जात आहे. अरुंद रस्त्यांमुळे अग्नीशमन दलाच्या वाहनांना येण्यास अडथळे येत होते. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेचे वृत्त समजताच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितिन देशमुख, शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक धिरज महाजन, स.पो.नि. संगीता राऊत यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here