लॉकअपला बाहेरुन कुलूप तरी चोरटा आला बाहेर

पुणे : ना कुलूप उघडले ना सळई वाकवली तरी लॉकअपच्या आतील चोरटा बाहेर आल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशनमधे उघडकीस आली आहे. लॉकअपच्या बाहेर आल्यानंतर पळून जात असलेल्या आरोपीला पुन्हा पकडून लॉकअपमधे टाकण्यात आले. या घटनेपासून खबरदारीचा उपाय म्हणून लॉकअपच्या सळयांना जाळी बसवली जाणार आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या प्रकाराने पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी काही वेळ तणावात आले होते.

या घटनेमागची सत्यता पडताळून पाहिली असता लॉकअपमधील चोरटा अंगाने सडपातळ होता. दोन सळयांमधील अंतर त्याला पळून जाण्यास पुरेसे होते. लॉकअपवरील गार्डच्या हा प्रकार उशीरा लक्षात आला असला तरी चोरटा पळून जाण्याच्या आत पुन्हा पकडला गेला. पोलिस अधिका-यांनी बाहेर आलेल्या व नंतर आत टाकलेल्या चोरट्याला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास सांगितले. त्याने सहजरित्या बाहेर येऊन दाखवले. अनेक सडपातळ गुन्हेगारांचा हातदेखील बारिक असतो. त्यामुळे ते हातकडीमधून हात सहज बाहेर काढू शकतात. अंगाने सडपातळ असणा-या गुन्हेगारांची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकवेळा समोर आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here