कर्ज वसुलीच्या लाखोच्या रकमेची जबरी लुट

जळगाव : महिला बचत गटाच्या कर्ज वसुलीची रक्कम बॅंक कर्मचा-याच्या ताब्यातून हिसकावून जबरी लुट झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. क्रेडीट अ‍ॅक्सीस ग्रामीण लिमीटेड (एनबीएफसी) या बॅंकेच्या जामनेर शाखेतील केंद्र व्यवस्थापक पदावरील कर्मचा-याची लुट वराड व विटनेर गावाच्या दरम्यान झाली आहे. 25 ते 30 वयोगटातील तिघा अज्ञात तरुणांविरोधात या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल शेषराव पाडळे या केंद्र व्यवस्थापकाने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

1 लाख 14 हजार 629 रुपये रोख व टॅब असलेली बॅग असा ऐवज हिसकावणारे तिघे लुटारु तरुण मराठी भाषेत बोलत होते. तिघा तरुणांनी सुनिल पाडळे या बॅंक कर्मचा-याला वराड ते विटनेर गावाच्या दरम्यान आज दुपारी एक वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करुन अडवले. या घटनेत मोटार सायकलवरील सुनिल पाडळे हा कर्मचारी खाली पडला. त्याच्या ताब्यातील रोख रक्कम व टॅब असलेली बॅग हिसकावत तिघांनी मिळून मारहाण करत हिसकावली. दरम्यान कमरेतून पिस्टल सारखे शस्त्र काढून धाक दाखवल्याने सुनिल पाडळे याने बॅगचा ताबा सोडला. त्यानंतर ती बॅग घेत तिघांनी पलायन केले.

सदर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, पोलीस निरीक्षक किरण बकाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी भेट दिली. आरोपीचा कसून शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here