मोटार सायकल चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

jain-advt

जळगाव : मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील भजे गल्ली परिसरातील हॉटेल सुयोग समोरुन चोरी झालेल्या मोटार सायकलचा गुन्हा उघडकीस आला आहे.

याप्रकरणी गुलशन अशोक कुमार यांनी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दाखल केली होती. पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने चोरट्यास कासमवाडी परिसरातून चोवीस तासांच्या आत मोटार सायकलसह अटक केली आहे. तपासी अंमलदार पो.हे.कॉ. सलीम तडवी व गुन्हे शोध पथकातील पो. ना. गणेश पाटील, पो.हे.कॉ. महेंद्र पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, पो.कॉ. रविंद्र साबळे, पो.कॉ. विकास पहुरकर आदींनी या तपासात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here