सहायक पोलिस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला

नळदुर्ग : मोटार सायकलवर कारवाई केल्याचा राग आल्याने तिघा तरुणांनी नळदुर्ग पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले स.पो.नि.सुधीर मोटे यांच्यावर हल्ला करण्यात आला. मंगळवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. यावेळी एका तरुणाकडून त्यांना तलवारीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी तिघा भावांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

शहरातील भवानी चौकात संदीप संजय राठोड याच्या मोटार सायकलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर संदिप राठोड तेथून निघून गेला. मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स.पो.नि. सुधीर मोटे व त्यांचा सह्कारी कर्मचारी रुपेश पाटील पेट्रोलिंग दरम्यान सुशील संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड हे तिघे भाऊ त्यांच्याजवळ आले. तू माझ्यावर कारवाई का केली असे म्हणत संदीप राठोड याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान सुशील याने शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत दगड घेऊन मारण्यासाठी धावला. रोहीतने हाताने त्यांच्या डोक्यात मारले. त्याचवेळी सुशील राठोड हातात तलवार घेऊन आला आणि तुला कापतोच असे म्हणत त्यांच्या दिशेने धावून आला. स.पो.नि. सुधीर मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here