चाकू हल्ल्यात जळगावचा तरुण ठार

जळगाव : जळगाव शहरातील समता नगर भागातील रहिवासी तरुणाचा चाकू हल्ल्यानंतर उपचारादरम्यान सामान्य रुग्णालयात निधन झाले आहे. सागर नरेंद्र पवार (28) असे चाकू हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो समता नगरातील डॉ.आंबेडकर पुतळ्यानजीक एकटाच रहात होता असे समजते.

मयत सागर याच्यावर 25 मार्चच्या रात्री चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर त्याला परिसरातील नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याने आपले प्राण सोडले. दरम्यान एक हल्लेखोर संशयीत निष्पन्न झाला असल्याचे समजते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here