नशेच्या औषधांची चोरटी विक्री करणा-या दोघांना अटक

नाशिक : मालेगाव शहरातील जुना आग्रा रोड परिसरात नशेच्या औषधांची चोरट्या मार्गाने विक्री करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. वसीम अहमद सलीम व रफिक अहमद निहाल अहमद अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून शहर पोलिसांनी 100 मिली वजन असलेल्या 337 खोकल्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या ताब्यातील दोघांकडे या औषधाची कुठलीही बिले नव्हती. गुजरात राज्यातून आणलेल्या औषधाची चोरटी विक्री करत असल्याचे अटकेतील दोघांनी पोलिसांना सांगितले. यामागील मुख्य सुत्रधार असलेल्या सराईत गुन्हेगाराला लवकरच अटक केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मालेगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक आहेर पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here