इंग्रजीची शिक्षिका जात होती विद्यार्थी घडवायला!– चोरुन चित्रीकरण करणारा बालकच बिघडलेला!!

पुणे : सोळा वर्षाच्या बालकाला व्यवस्थित इंग्रजी बोलता यावे हा चांगला हेतू नजरेसमोर ठेवत पालकांनी त्याच्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक केली होती. ती शिक्षिका घरी येऊन त्या मुलाची इंग्रजी विषयाची शिकवणी घेत होती. मात्र तो सोळा वर्षाचा बालक बिघडला होता असे म्हणावे लागेल.

शिक्षिकेचे मुर्तीमंत रुप मोबाईल कॅमे-यात चित्रबद्ध करण्याची कुबुद्धी त्याला सुचली. अधूनमधून ती शिक्षिका वाश रुममधे जात असल्याचे त्या सोळा वर्षाच्या बालकाच्या नजरेने टिपले होते. हाच धागा पकडून त्याने बाथरुममधे चोरुन लपून मोबाईल कॅमेरा सेट केला होता. त्या कॅमे-याच्या मदतीने 56 वर्ष वयाच्या त्या शिक्षीकेचे व्हिडीओ चित्रीकरण त्याने मिळवले. हा प्रकार शिक्षेकेच्या लक्षात येताच तिने त्या विधीसंघर्षीत सोळा वर्षाच्या बालकाविरुद्ध अलंकार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पुण्यातील कर्वे नगर परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकाराने खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here